Friday, October 25, 2013

'ती'

'ती'

सारखं माझ्यावर रागावते,
बारीक बारीक चुका काढते,
प्रत्येक वेळी टोचून बोलते,
जोराने माझा कान ओढते,
तरीही मला ती खूप आवडते,

खुपदा उगाचच भांडते, बोलण टाळते,
"आम्ही नाही जा," म्हणत रुसून बसते,
आणि तास भराच्या आताच,
स्वतःच sry sry करते,
तरीही मला ती खूप आवडते,

"माझ्याकडे बघतच नाहीस,"
"बोलत का नाहीस माझ्याशी ??"
"तुला मी आजकाल आवडत नाही,"
अशी बडबड करून अक्षरशः डोक्यात जाते,
तरीही मला ती खूप आवडते,

"आपलं पुढे कस होणार रे ??,"
"घरचे तयार होतील ना रे आपल्या लग्नाला??",
"आपण पळून जावूया का??"
"मग आई-बाबांना काय वाटेल??",
सगळ स्वतःच बोलून टाकते,
तरीही मला ती खूप आवडते,

"हे तुला जमत नाही तरी का करतोस??"
"तू हा course का नाही करत"
"अरे इकडे इकडे असा असा job  आहे"
फक्त माझाच विचार करते
म्हणूनच मला ती खूप आवडते,

"काय करतो आहेस??"
"जेवलास का नीट??"
"आज तुझ्या नावाने उपवास केलाय"
"तू ये नारे जवळ माझ्या"
अस बोलून जीवाचं पाणी पाणी करते,
म्हणूनच मला ती खूप आवडते.
#social_ak

No comments:

Post a Comment