Monday, February 17, 2014

ती सुंदर कल्पना !!

माझ्या डोळ्या देखत ओढलं त्याने,
काळाकुट्ट इसम,
अंगारलेले डोळे,
ताकद एखाद्या हत्तीची त्याच्या अंगी
अंगावर माझ्या शहारे
काहीच कळेना
पण किंचाळण्याचा आवाज मात्र कानावर
"वाचवा कुणीतरी"
काळीज फाडणारी आर्त किंकाळी,
जीव जातानाची सुद्धा नसेल होत अशी तडफड,
हाताच्या मुठी आवळून पुढे होणार मी,
इतक्यात अजून भयानक ३-४ जन मागून,
लोकांची पळापळ, भेदरलेल्या मेंढरांसारखी,
पण किंकाळण्याचा आवाज मात्र हळू हळू तीव्र,
काय करावे अशा वेळेला हे कळत होत,
मानाने ही केला निर्धार,
आयुष्यभर ज्या पुस्तकातून प्रेरणा घेतल्या,
त्यांची एकेक पान डोळ्यासमोर,
पण शरीर साथ देईना,
भोवळ येवुन पडतो कि काय,
काय चाललंय, थांबवायला हव आपण,
सरकलो त्या दिशेने,
नकळत पणे हातात दगड हि घेतला,
आणि पोटाची आतडी फाटेपर्यंत तोंडातून आवाज निघाला,
हिजड्यांच्या औलादी सगळ्या दचकल्या बहुतेक,
माझ्या दिशेने आले काही,
आणि
आणि
बस्स!
डोळ्यासमोर अंधार,
कधी न मिळालेली शांत झोप,
समोर फक्त शांत, निरभ्र आभाळ,
पक्षांचा मंजुळ किलबिलाट,
मंद वारा,
अचानक समोर,
एक सुंदर ललना, तितक्याच सुंदर वेशात,
काय तीच ते रूप, आहा!!
अस्सल नक्षत्र,
सगळ्या परीकथा आठवत,
नकळत गेले दोन्ही हात पुढे,
तिनेही आपले नाजूक हात हातावर ठेवले,
जवळ येवुन कानात काहीतरी कुजबुजली,
आणि,
अचानक,
कुठे गेली,
आता तर होती,
मी शोधू लागलो,
पन कुठेच दिसेना,
मी फक्त एकटा ,
रडू आवरेना आता तर,
इतक्यात,
"काय झालं बाळा?"
खाड्कन जाग,
माझं घर
आईचे रडणारे केविलवाणे डोळे ,
समोर,
मैताला आल्यासारखे बाकीचे सगळे आजूबाजूला,
"आई काय झालं ग?? मला नाही आठवत आहे काहीच. सांग ना."
कोणीच काही बोलायला तयार नाही,
"सांग ना ग आई, बाबा तुम्ही तरी सांगा"
आवाज निघेना घशातून,
कितीवेळ असा पडून होतो कुणास ठावूक,
"तुझा प्रयत्न फसला बाळा." आईचा हुंदका,
अचानक सगळी चक्र उलटी,
त्या नराधमांनी ,
संपवलं होत एक सुंदर स्वप्न,
ती सुंदर परी !
ती सुंदर कल्पना !!