तसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा, आपल्या सुखात स्वतःच सुख मानणारा, असं काहीसं ज्याकडे असेल त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला वेळ, काळ, रंग, जात-पात, उंची, जाडी या काश्शाचीही गरज नसते. फक्त दोन मन जुळायला लागली कि हळूहळू ते एका चांगल्या नात्याचं रुपांतर घेत जात. योग्य त्यावेळी त्याला योग्य तसा आकार दिल्यास आयुष्यभर साथ देणारी भक्कम व्यक्ती आपण आपल्या जवळ बाळगू शकतो. मग इतर कोणाचीही गरज भासत नाही आपल्याला.
प्रश्न असा आहे कि, आजच्या वातावरणात असं कोणी सापडेल का हो आपल्याला??
आजकाल ज्यावयात मुलांना स्वतःची चड्डी सांभाळता येत नाही, त्याच्याकडेच ४-४ girlfriends असतात, आणि तो मुलगापण हे असं सांगत असतो कि जणू कुठे फार मोठी लढाई जिंकून १०-१२ किल्ले जिंकले असावेत.
हे असत कहो प्रेम?
कि प्रेम या नावाचा गैरवापर करून, दोन्ही बगलेत २-२ प्रेमिका कवटाळून, आपली छाती आणि मान वर करून चालणाऱ्या कडून शिकायचं का प्रेम म्हणजे काय ते?
मुलींचंहि तसंच, आजकाल सर्रास २-३ boyfriends फिरवणाऱ्या मुलींचीही कमतरता नाही आहे आपल्या समाजात.
काय चाललंय नेमक ते खरच समजण्या पलीकडच आहे.
पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब वाढलाय हे मान्य आहे कि, पण कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा आणि कशाचा नाही इतकी अक्कल तरी आजकाल सगळ्यांच्याकडे असेलच. जे चांगल ते घ्या कि, जे वाईट आहे ते नकोच, त्याची गरजच नाही आहे, पण आपण नेमक तेच शिकतोय त्यांच्याकडून, आणि त्या वाईट गोष्टी हळूहळू आपण आपल्या समाजात आपल्याच रूढी-परंपरे सारख्या वापरत आणि पसरवत आहोत.
हे फार धोक्याच आहे, अजून त्याने बाळसं धरलेलं नसलं तरी येणाऱ्या काही वर्षात याचा फार मोठा त्रास आपल्या युवा वर्गाला होणार आहे.
स्पष्ट भाषेत सांगायचं झाल तर मी हे अशाकरता म्हणतोय कि,
स्पर्धा वाढली आहे, रोज आपल्याला फार मोठ्या तानतणाव खालून जाव लागतंय. आणि तो तानतणाव दूर करण्यासाठी आपला तरुण वर्ग सरळसरळ आपल्या partner वरच अवलंबून आहे. त्यामुळे आणि आत्ता तर सरकारी कायद्यामुळे (१८+ कायदा) एकमेकांशी physical होण्याकरता कशाचीहि बाधा येणार नाही.
तुम्ही काय हव ते करा हो. आम्ही कोण सांगणार करा किंवा नको ते.
पण याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम तुम्ही समजून घ्या इतकाच.
मुलांना याचा काही त्रास होत नाही, हे science आहे. पण मुलींचं काय, त्यांना खरच फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत. भले सगळ safe असलं तरी.
हे झाल एक कारण,
पण तुमच्या आयुष्यभराचा जेंव्हा प्रश्न येईल तेव्हा जर तुमचा partner असला तर ठीक, पण नसला तर? त्यावेळेस काय करणार? परत दुसऱ्या कुणावर प्रेम??
म्हणजे परत नव्याशी सगळ तेच rewind करायचं जे आधी झालंय??
पण कितीही प्रयत्न केला तरी तो पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, विसरू शकाल??
माणूस प्राण्याला इतरांपेक्षा वेगळा मानलं जात कारण तो आपल्या एकाच सह्चारीकेसोबत स्वतःच अख्खं आयुष्य व्यतीत करतो. नाहीतर आपल्यात आणि इतर प्राण्यामद्धे फरक तो काय?
प्रेम करा, खूप प्रेम करा, पण फक्त योग्य व्यक्तीवर करा, आणि असं करा कि त्याच्याशिवाय इतर कोणाचाही कधीच विचार येणार नाही आपल्याला.
हिर-रांझा, लैला-मजनू, अशी उदाहरणं आपण प्रेम करताना एकमेकांना देत असतोच ना.
त्यांनी कधीच शारीरिक सुखासाठी नव्हत हो केलं प्रेम.
पण आजकालच पोषक वातावरण ह्या सगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टींना मारक असं आहे.
फक्त तुम्ही त्याचा भाग होऊ नका आणि आपल्या भडक प्रेमाचं उदाहरण ठेवू नका.