Yellow
"अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू?? सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग? त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ."
ऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.
अपेक्षा भंग.
आजकाल प्रत्येक
व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित
म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा,
आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो
मागत असतो.
काही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.
पण काही जन नाही
करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण
करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे
ते multitasker नसतात.
पण यामुळे
त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग
होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.
आपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.
आपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.
जे आहे ते चांगल अस
म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच
त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला.
त्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.
सोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.
मुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.
(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )
No comments:
Post a Comment