आमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात.
तर असंच परवा आमच्या गावातला एक 'पंटर' सापडला आणि बोलता बोलता आमचा विषय 'हागणदारी मुक्त' वरून 'पाणी बचाव आंदोलना'पर्यंत कसा गेला ते पहा :
मी : काय म मज्जा हाय लगा तुमची. सरकार आता तुमच हगलेल बी काढालंय.
पंटर: कसलं काय घेवून बसलाइस. सरकार हगलेल काढतंय पर त्यासाठी सकाळी तासभर चड्डी धरून उभा रहायला लागतंय त्येच काय.
मी: तवढी कळ तर सोसायला पायजेलच की. तुम्हाला फुकट बी पायजे आणि लगेच बी. कस जमल. सोसा जरास आसुदे म्हणून.
पंटर: ते सोसालायोच र. पर कामाचा खुळांबा व्हायलाय कि त्यापायी. च्यामायला हगायला जायचं म्हणून सकाळी लवकर उठाया लागालंय नाहीतर पुढ धार काढायचं आणि वैरण आणायचं काम बोंबलतय.
मी: ते बी खर हाय म्हणा. बाकी पावसा-पाण्याच काय. पेरण्या काय म्हणत्यात.
पंटर: काय न्हायी लगा यंदा. पेरण्या झाल्या खर पाऊस न्हायी, पिकं गेली समदी. प्यायला बी पाणी नाही. धरणातालच पाणी आटायला लागलंय आता.
मी: सगळीकडच र. पाप केल्यासात तुम्ही, त्याच भोगा आता.
पंटर: त्येच मी म्हणतोय, हि गावोगावी कशाला संडास सरकार बांधालय? ह्यामुळच पाणी टंचाई आलीया.
मी: हाहा, काय बी बोलू नग. त्येच्याआयला तुम्हाला हवेशीर बसायचं असतंय म्हणून आता त्येला दोष दे.
पंटर: न्हायी र. खरच तर. बघ हा. गेली १०-१५ वर्ष चालू हाय सरकारची योजना. त्यामुळ आता पर्यंत महाराष्ट्रभर संडास बांधून झाली असतील. साधारण पण एका माणसाला दिवसाकाठी सरासरी १० लिटर पाणी लागतंय.
मी: डोचक नासलय. तिथ काय आंघोळीला जात्यात व्हय.
पंटर: तुला काय माहित त्यातलं. संडास बांधल्यापास्न समदी बामन झाल्यात. म्हणून संडासात शिरायच्या आदी पाणी व-वतुन पाक करून घेत्यात आणि मंगच आत जात्यात.
मी: हात्येच्या आयला.
पंटर: तर १० लिटर पाणी एका माणसाला म्हटल्यावर १००० माणसाला १०००० लिटर पाणी रोजच. आदीमधी जात्यात ते आणि येगळच. आता हिशेब तूच लाव भावा. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वाया जाणार पाणी. त्येच जर उघड्यावर परंतु गावापासून दूर कुठतरी चर मारून संडास बनवली असती तर एका तांब्यात म्हणजे एक लिटर पाण्यात सगळ आटोपलं असत. त्यात आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीत बी मुरलं असत. रोगराई पसरू नये म्हणून त्या मलमुत्रावर औषध फवारल असत म्हणजे कसलंच टेंशन न्हायी. निदान नाही म्हटलं तरी आत्ता जेवढ पाणी वय जातंय त्यातलं अर्ध तरी या नुसार आपल्याला नक्कीच वाचवता आल असत. पर तुमच्या आडणी भोकाच्या सरकारला कळणार कधी. नुसत पैशाची नासाडी दुसर काही न्हायी. नाव मोठ करायला आणली यांनी योजना आणि हगायला पायजे म्हणून प्यायलाच पाणी मिळणा अशी अवस्था झालीया.
मी: ….
पंटर न मारली एकच फाईट आणि माझीच झाली कि हो टाईट
No comments:
Post a Comment