चड्डीतलं वय
ते चड्डीतल वय असतं,तेंव्हा फक्त ओरडणं, खेळाणं आणि बागडनं असतं,
राग आला कि मारणं असतं,
आणि कुणीतरी मारल्यावर बोंबलत घरी पळणं असतं,
ते वयचं तसलं असतं,
शाळेत न जाण्याची कारणं शोधणारं असतं,
कोणी जबरदस्ती केल्यावर त्यांच्याच हाताला चावणारं असतं,
खडू पेन्सिल खाणारं असतं,
आणि नवीन आणायला पैसे मागणारं असतं,
ते वयचं तसलं असतं,
कोणाच्या तरी हातातलं चांगलं खेळणं बघून रडणार असतं,
ते कस मोडता येईल हे बघणार असतं,
मोडल्यावर त्याला चिडवणार असतं,
पण त्याला जास्त रडताना बघून पुन्हा सांभाळणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
आपल्या गोष्टीवरती अधिकार गाजवणारं असतं,
त्याला हात लावला तर घर डोक्यावर घेणार असतं,
आणि शेवटी त्याची मालकी परत मिळवणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
पुन्हा कधीच येणारं नसतं..!!
#mimarathiap

No comments:
Post a Comment