Monday, May 12, 2014

कोणी माणूस आहे का, माणूस??

काळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत.
शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा.
दुसरं अस काहीच त्यांच्या जगण्याचा उद्देश नाही आहे.
हा काही अपवाद आहेत जे खरच एक माणूस म्हणून जगतात, इतरांना जगायला शिकवतात, संघटीत करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात त्यांना यश आहे परंतु ते फारच कमी प्रमाणात.
आजकाल लोकांना आपल्या बाजूला काय चाललंय याच सुद्धा भान राहिलेलं नाही, दुसर्यांच्या लग्नात लागलेला dj ऐकून कानाला हात लावून त्यांच्या नावाने बोट मोडणारे लोक आपल्या पोरांच्या लग्नात मात्र त्या वरच ठेका धरत असतात.
कित्येक वेळा आजूबाजूला हिंस्र पशु सारखी मनुष्यवृत्ती सुद्धा आदळून येते, बायाकापोरींना छेडणे, मारामाऱ्या करणे, दिवसाढवळ्या म्हातार्या माणसांना लुटणे यासारखे प्रकार आजकाल सर्रास दिसू लागले आहेत, मात्र त्यावेळी त्यांना आळा घालणे सोडून त्या वेळेवर टीकाटिपण्णी मात्र वाढू लागली आहे.
मोबाईल ने तर खरच क्रांती केली आहे, माणसं तोडायची, (माणसं जोडली असतीलही पण तोडली जास्त जातात, विचार करून बघा.) ह्याविषयी कितीही बोलाल तर ते कमीच आहे.
आपल आपल म्हणण्याच्या नादात मात्र माणूस एकमेकांपासून दूर जायला लागलाय.
पूर्वी एकत्र साजरे होणारे सण उत्सव आजकाल holidays झालेत.
आजी आजोबांच्या गोष्टी आता outdated झाल्यात.
भावंडासोबतचे खेळ पूर्वीसारखे रंगेनसे झालेत,
आईची माया सुद्धा आजकाल artificial वाटायला लागलेय.
मित्रमंडळी फक्त दारू आणि पार्टी पुरतीच मर्यादित झाली आहे.
माणूस प्रगत होत चालला आहे,
कमवत चालला आहे,
महिन्याला दोन-दोन मोबाईल बदलत चालला आहे,
माणूस माणसांतूनच हरवत चालला आहे.

सुख म्हणजे??



प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतता, त्यामुळे सुखासाठी पळत्याच्या पाठी न लागता जे आहे त्यातच समाधान माना आणि आहे ते चांगल आहे अस मानून पुढे चालत राहा.
आपण खुपदा अनुभवी माणसाणांकडून ऐकत असतो, मूड चांगला असला की आपल्याला ते सगळ पटत सुद्धा (मोठ्यांच बोलन ऐकून घेण ही सुद्धा एक कला असल्यामुळे त्याला असावा मूड लागतो.) आणि कधीकधी आपण खरच असल्या काहीशा गोष्टींवरती विचार करत बसतो कारण त्या काहीतरी खर सांगत असतात.
पण खुपदा ह्या रोजच्या दगदगीमधे पुन्हा आपण हरवतो. मनाला आणि शरीराला बर वाटेल अशा गोष्टीमधे पुन्हा फक्त सुख शोधू लागतो. जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवतेय किंवा ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण आनंदी आहोत त्यांच्या कडेच आपण झुकत रहातो.
परंतु त्याच वेळी ज्या व्यक्ती आपल्याला आपल्याला (वाटणारा) त्रास देतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्या आनंदावर विरजण येत किंवा आपल्याला दुःख होत राग येतो अशा व्यक्तीना मात्र आपण टाळत रहातो. आणि या व्यक्तीं मद्धे बघायला गेल तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी मंडळी असते. म्हणजे बघायला गेल तर आपण आपल्याच माणसांना कंटाळतो, त्यांची काहीच किंमत ठेवत नाही. जिची पूजा करायला पाहिजे त्या आई-बहिणीच्या नावाने एकमेकांना शिव्या घालतो. म्हणजे त्यांच्या वरचा खरतर तिरस्कारच आपण लोकांसमोर मांडत असतो.
पण का?? कारण ते उगाच इरिटेट करतात, नको असतानाही 'लेक्चर' देत बसतात न ऑल.
खरतर हीच लोक आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला बोलत असतात हे मात्र आपण विसरतो, आणि क्षणभंगुर अशा काही 'सुंदर' बोलणाऱ्या लोकांकडे आपण आकर्षित होतो.
माझ ही तसच, आईची आणि माझी सर्रास भांडण होत असतात. मी ही रागाच्या भरात तिला काहीही बोलून कुठेतरी जातो, ती मात्र रोज माझी अरेरावी ऐकून घेत असते, आणि काहीही न बोलता मागच सगळ विसरून रोज सकाळी हसऱ्या चेहऱ्याने माझ्या सुंदर दिवसाची सुरवात करते.
शेवटी आपली ती आपलीच मानस असतात, हे फ़क़्त आई साठी नसून माझा भाऊ, पप्पा, माझे खूप सारे मित्र आणि 'ती' सुद्दा. सगळे मला समजून घेतात आणि प्रत्येक दिवशी आपल्या वाट्याला येणार्या सुखाच्या काही ओंजळी माझ्यावर उधळतात. म त्यांच्यामुळे झाला, तरी थोडासा त्रास आपण का नाही समजून घ्यावा.
सुख म्हणजे पैसा, घर, गाडी, चिकणी गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड हे आहे, की आईच्या हातचा धपाटा, बाबांचे हळूच मारलेले टोमणे, मित्रांनी भांडून वाटून खाल्लेला वडापाव आणि तिने/त्याने अचानक फोन करून म्हटलेल 'i love you.'
पैसा तो हात का मैल है, आणि कमवायला अख्ख आयुष्य पडलय. पण आपल पाकीट अगोदरच इतक्या प्रेमळ माणसांनी भरलय तर अजून कशाची गरज आहे.
आहे ते एंजॉय करायच बस्स, और क्या चाहिये जिंदगी से.

Monday, February 17, 2014

ती सुंदर कल्पना !!

माझ्या डोळ्या देखत ओढलं त्याने,
काळाकुट्ट इसम,
अंगारलेले डोळे,
ताकद एखाद्या हत्तीची त्याच्या अंगी
अंगावर माझ्या शहारे
काहीच कळेना
पण किंचाळण्याचा आवाज मात्र कानावर
"वाचवा कुणीतरी"
काळीज फाडणारी आर्त किंकाळी,
जीव जातानाची सुद्धा नसेल होत अशी तडफड,
हाताच्या मुठी आवळून पुढे होणार मी,
इतक्यात अजून भयानक ३-४ जन मागून,
लोकांची पळापळ, भेदरलेल्या मेंढरांसारखी,
पण किंकाळण्याचा आवाज मात्र हळू हळू तीव्र,
काय करावे अशा वेळेला हे कळत होत,
मानाने ही केला निर्धार,
आयुष्यभर ज्या पुस्तकातून प्रेरणा घेतल्या,
त्यांची एकेक पान डोळ्यासमोर,
पण शरीर साथ देईना,
भोवळ येवुन पडतो कि काय,
काय चाललंय, थांबवायला हव आपण,
सरकलो त्या दिशेने,
नकळत पणे हातात दगड हि घेतला,
आणि पोटाची आतडी फाटेपर्यंत तोंडातून आवाज निघाला,
हिजड्यांच्या औलादी सगळ्या दचकल्या बहुतेक,
माझ्या दिशेने आले काही,
आणि
आणि
बस्स!
डोळ्यासमोर अंधार,
कधी न मिळालेली शांत झोप,
समोर फक्त शांत, निरभ्र आभाळ,
पक्षांचा मंजुळ किलबिलाट,
मंद वारा,
अचानक समोर,
एक सुंदर ललना, तितक्याच सुंदर वेशात,
काय तीच ते रूप, आहा!!
अस्सल नक्षत्र,
सगळ्या परीकथा आठवत,
नकळत गेले दोन्ही हात पुढे,
तिनेही आपले नाजूक हात हातावर ठेवले,
जवळ येवुन कानात काहीतरी कुजबुजली,
आणि,
अचानक,
कुठे गेली,
आता तर होती,
मी शोधू लागलो,
पन कुठेच दिसेना,
मी फक्त एकटा ,
रडू आवरेना आता तर,
इतक्यात,
"काय झालं बाळा?"
खाड्कन जाग,
माझं घर
आईचे रडणारे केविलवाणे डोळे ,
समोर,
मैताला आल्यासारखे बाकीचे सगळे आजूबाजूला,
"आई काय झालं ग?? मला नाही आठवत आहे काहीच. सांग ना."
कोणीच काही बोलायला तयार नाही,
"सांग ना ग आई, बाबा तुम्ही तरी सांगा"
आवाज निघेना घशातून,
कितीवेळ असा पडून होतो कुणास ठावूक,
"तुझा प्रयत्न फसला बाळा." आईचा हुंदका,
अचानक सगळी चक्र उलटी,
त्या नराधमांनी ,
संपवलं होत एक सुंदर स्वप्न,
ती सुंदर परी !
ती सुंदर कल्पना !!

Thursday, January 30, 2014


Yellow

Yellow Marathi Movie


"अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू?? सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग? त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ." 
ऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.



अपेक्षा भंग.

आजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.
काही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.
पण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात. 

पण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.

आपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.

आपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.

जे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला. 

त्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.

सोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.

मुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.

(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )

Friday, January 10, 2014

भडक प्रेम

love triangle, love, triplets

तसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा, आपल्या सुखात स्वतःच सुख मानणारा, असं काहीसं ज्याकडे असेल त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला वेळ, काळ, रंग, जात-पात, उंची, जाडी या काश्शाचीही गरज नसते. फक्त दोन मन जुळायला लागली कि हळूहळू ते एका चांगल्या नात्याचं रुपांतर घेत जात. योग्य त्यावेळी त्याला योग्य तसा आकार दिल्यास आयुष्यभर साथ देणारी भक्कम व्यक्ती आपण आपल्या जवळ बाळगू शकतो. मग इतर कोणाचीही गरज भासत नाही आपल्याला.
प्रश्न असा आहे कि, आजच्या वातावरणात असं कोणी सापडेल का हो आपल्याला??
आजकाल ज्यावयात मुलांना स्वतःची चड्डी सांभाळता येत नाही, त्याच्याकडेच ४-४ girlfriends असतात, आणि तो मुलगापण हे असं सांगत असतो कि जणू कुठे फार मोठी लढाई जिंकून १०-१२ किल्ले जिंकले असावेत.
हे असत कहो प्रेम?
कि प्रेम या नावाचा गैरवापर करून, दोन्ही बगलेत २-२ प्रेमिका कवटाळून, आपली छाती आणि मान वर करून चालणाऱ्या कडून शिकायचं का प्रेम म्हणजे काय ते?
मुलींचंहि तसंच, आजकाल सर्रास २-३ boyfriends फिरवणाऱ्या मुलींचीही कमतरता नाही आहे आपल्या समाजात.

काय चाललंय नेमक ते खरच समजण्या पलीकडच आहे.
पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब वाढलाय हे मान्य आहे कि, पण कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा आणि  कशाचा नाही इतकी अक्कल तरी आजकाल सगळ्यांच्याकडे असेलच. जे चांगल ते घ्या कि, जे वाईट आहे ते नकोच, त्याची गरजच नाही आहे, पण आपण नेमक तेच शिकतोय त्यांच्याकडून, आणि त्या वाईट गोष्टी हळूहळू आपण आपल्या समाजात आपल्याच रूढी-परंपरे सारख्या वापरत आणि पसरवत आहोत.
हे फार धोक्याच आहे, अजून त्याने बाळसं धरलेलं नसलं तरी येणाऱ्या काही वर्षात याचा फार मोठा त्रास आपल्या युवा वर्गाला होणार आहे.

स्पष्ट भाषेत सांगायचं झाल तर मी हे अशाकरता म्हणतोय कि,
स्पर्धा वाढली आहे, रोज आपल्याला फार मोठ्या तानतणाव खालून जाव लागतंय. आणि तो तानतणाव दूर करण्यासाठी आपला तरुण वर्ग सरळसरळ आपल्या partner वरच अवलंबून आहे. त्यामुळे आणि आत्ता तर सरकारी कायद्यामुळे (१८+ कायदा) एकमेकांशी physical होण्याकरता कशाचीहि बाधा येणार नाही.
तुम्ही काय हव ते करा हो. आम्ही कोण सांगणार करा किंवा नको ते.
पण याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम तुम्ही समजून घ्या इतकाच.
मुलांना याचा काही त्रास होत नाही, हे science आहे. पण मुलींचं काय, त्यांना खरच फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत. भले सगळ safe असलं तरी.

हे झाल एक कारण,
पण तुमच्या आयुष्यभराचा जेंव्हा प्रश्न येईल तेव्हा जर तुमचा partner असला तर ठीक, पण नसला तर? त्यावेळेस काय करणार? परत दुसऱ्या कुणावर प्रेम??
म्हणजे परत नव्याशी सगळ तेच rewind करायचं जे आधी झालंय??
पण कितीही प्रयत्न केला तरी तो पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, विसरू शकाल??

माणूस प्राण्याला इतरांपेक्षा वेगळा मानलं जात कारण तो आपल्या एकाच सह्चारीकेसोबत स्वतःच अख्खं आयुष्य व्यतीत करतो. नाहीतर आपल्यात आणि इतर प्राण्यामद्धे फरक तो काय?

प्रेम करा, खूप प्रेम करा, पण फक्त योग्य व्यक्तीवर करा, आणि असं करा कि त्याच्याशिवाय इतर कोणाचाही कधीच विचार येणार नाही आपल्याला.
हिर-रांझा, लैला-मजनू, अशी उदाहरणं आपण प्रेम करताना एकमेकांना देत असतोच ना.
त्यांनी कधीच शारीरिक सुखासाठी नव्हत हो केलं प्रेम.
पण आजकालच पोषक वातावरण ह्या सगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टींना मारक असं आहे.
फक्त तुम्ही त्याचा भाग होऊ नका आणि आपल्या भडक प्रेमाचं उदाहरण ठेवू नका.

Tuesday, January 7, 2014

प्रेमाचा Timepass

Connected 24x7


तुम्ही म्हणाल कि याला दुसरं काही सुचत कि नाही.
पण खर म्हणजे हा विषय आहेच इतका खोल कि त्याच कधीच कोणीही मोजमाप करू शकणार नाही.
पण तरीही आज जरा वेगळ्या दृष्टीने या प्रेमाकडे बघण्याची वेळ आली आहे .
आज जिकडे बघावं तिकडे आपल्याला प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेमाचा (त्यांच्या भाषेत बर का) वर्षाव करत असतात,
दिवसभर mobile वर बोलत असतात, ते झाल कि म Facebook chat, Gtalk आणि आता Whatsapp, इतक उतू जाणार प्रेम आणतात तरी कुठून हा माझ्यापुढचा फार मोठा प्रश्न आहे. (कारण याच मुळे मला फार शिव्या पडतात तिच्याकडून, तिच्या मते मी बोलतच नाही म्हणे, असो )
पण खरच काहो हे दिवसभर इतके close राहिल्यावरच तुमच एकमेकावरच प्रेम वाढत असेल?
ह्या विषयाला नंतर कधीतरी सविस्तर बघूया.
पण अस बोलता बोलता किती वेळ वाया घालवतोय हे आपण कधी पाहिलंय?
आपण गणितच मांडू त्यापेक्षा,
सकाळी उठल्यावर अर्धातास whatsapp वर (अंथरुणात पडल्या पडल्याच)
त्यानंतर collage किंवा office ला जाताना जीतका काही वेळ मध्ये येईल तेवढा वेळ फोन वर,
तरी आपण १ तास धरू.
office मध्ये गेल्यावर आजकाल तर सगळ्यांकडे WiFi असल्यामुळे दिवसभर Facebook सुरूच असते, तरी त्यातला फक्त १ तास आपण धरू,
( collage मध्ये जाणारे बसतात का कधी lectures ला? ते हिशेबात नको )
त्यानंतर घरी जाताना परत १ तास फोन वर.
घरी आल्यावर पुन्हा whatsapp चालू तो रात्री १-२ वाजल्याचे भान नसे पर्यंत.
(आई किंवा वडिलांनी कंबरेत लाथ घालेपर्यंत म्हणा हव तर)
म्हणजे कमीतकमी आणि जवळजवळ ५ ते ६ तास आपण एकमेकांशी connected असतो
(हा सरकारी आकडा नाही बर का, नाहीतर press वाले धरतील मला )

आता फक्त एवढा विचार करा कि ह्या वेळात आपण काय काय करू शकलो असतो.
मला सांगायची गरजच नाही.तुम्हाला माहित आहेच कि या वेळात आपण काय काय करू शकतो ते. (अर्थात तुम्ही सगळे समंजस आहातच. )

सांगायचं एवढच कि प्रेम करा, प्रेम हे व्हायलाच पाहिजे एकदातरी आयुष्यात. प्रेमासारखी दुसरी कोणतीच गोष्ट किंवा भावना ह्या सृष्टीत सापडणारच नाही किंवा आहेच नाही अस म्हटलं तरी त्याची अतिशयोक्ती होणार नाही,
पण त्याच प्रेमासाठी आपला Timepass होणार नाही याची फक्त काळजी घ्या.
जीवन सुंदर आहे, पण ती सुंदरता जरा जपून वापरा, आपल्याच हातून गळा नका घोटू त्या सुंदरतेचा. आपल्या पुढच्या आयुष्यासाठी राखा काहीतरी, किंवा निरस असे बेचव आयुष्य जगायची तयारी करा.

(जरा नवी पद्दत आज वापरली आहे, तरी सांभाळून घ्या)

Monday, January 6, 2014

|| सत्यवचन ||

योग्य तो वकत पाहावा | तेव्हाची उठाव हाणावा ||
सोडूनी मोहाचे पाश | व्यवहार आपला जाणावा ||

मनी नसावी कसची चिंता | समयी आळवावे भगवंता ||
आपण आपुले कर्म करावे | बाकी भाड में जाये जनता ||


Marathi, calligraphy, old, sant, aakashpatil, mimarathiap
|| सत्यवचन ||

Saturday, January 4, 2014

तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक

"काय ह्या ईशाचे नखरे?? आईवर ओरडायला काय झालाय हिला?? त्या बिचारीला काय माहित?? जर एकांत हवा होता तर घरी यायचंच कशाला?? change it !! .. दुसरं काहीतरी लाव..,"
- माझे पप्पा (3 जानेवारीचा  ELTG चा एपिसोड पाहताना)

खरच आपली generation आहेच थोडी short -tempered. जरा काही मनासारख नाही झालं, कि घ्यायचं घर डोक्यावर, आकांडतांडव करायचा, आपल्याच माणसावर ओरडायचं, हे आता घराघरात चालू आहे. कुणाचा राग आपण कुणावर काढतोय याच सुद्धा भान आजकाल आपण विसरत चाललोय. त्यावेळेला ज्याच्यावर रागावलोय त्या व्यक्तीला तर डोळ्यासमोर येवूच देत नाही, मात्र त्या व्यक्तीशी related इतरांवरही आपण आपला राग दर्शवतो.
तसं बघायाला गेल तर थोड बोलून, आपापली बाजू मांडून, विचार विनिमय करून जे पण काही वाद किंवा गैरसमज असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आजकाल जो सगळ्यामध्ये ठासून भरलाय असा स्वाभिमानरुपी EGO(!) आपल्याला हे सगळ करू देतंच नाही. त्याच म्हणन असत कि मीच का म्हणून माघार घेवू, मीच का म्हणून सगळ सहन करू, माझ्याच बद्दल अस सगळ का घडतंय आणि इतर ROFL टाईपचे नाना प्रश्न. पण आपल्या EGO मुळे आपली माणस पण दुखावली जात आहेत हे मात्र त्यावेळेस आपण विसरतो.
काहीजानासोबत discussion केल्यावर मला अस लक्षात आल कि, हे सगळ भीतीमुळे पण होत कधीकधी. एका प्रकारची insecurity निर्माण होते मनात आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागतो , पण त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे आपण लक्षात नाही घेत. ती व्यक्ती पण दुखावलेली असेल, त्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा असतील, त्याला पण स्वतःचे काही problems असतील.
जरा विचार करा, तुम्ही एखाद्याला जेंव्हा I Love You म्हणताय, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्या हृदयात स्थान देताय, मग तुम्ही त्याची एखादी चूक सुद्धा समजून नाही घेवू शकत?? काय नेमक आहे हे तरी कमीतकमी जाणून घ्या कि राव, अस तडकाफडकी नाती तोडून, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण लाथाडून, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पण वागणार नाही अस त्याच्याशी वागण बर वाटत का??
आणि नंतर आपली चूक लक्षात आली कि मग sorry sorry चे msgs करायला परत आपण तयार, म्हणजे व्यक्ती आपल खेळण आहे, जेंव्हा वाटेल तेव्हा छातीशी कावटाळाव नको तेंव्हा फेकून द्याव. हि कसली पद्धत??
प्रत्येकाला स्वतःच स्थान आहे, प्रत्येक जन स्वतःच्या जागी योग्य आणि बरोबर आहे, प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आहेतच, त्याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे, पण म्हणून त्याने कसंही वागण योग्य नाही. कारण आपल्याला लोकांमध्येच राहायचं आहे, म्हणून त्यांच्याशी जुळवून घेण सुद्धा आपल कर्तव्य आहे.
nw grow up!! आपण लहान तर नाही न आता. वाद झालेच तर जरा डोक शांत ठेवा, समोरच्याचं ऐकून घ्या. कोणाच ऐकून घेतलं म्हणजे तुम्ही लहान व्हाल अस काही नाही. पण त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतय ते करा. after all तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक.

( हा फक्त माझा स्वतःचा विचार आहे. आवडल तर घ्या नाही तर next please करा.)

Saturday, December 28, 2013

प्रेमात पडल्यावर

प्रेमात पडल्यावर 


पहिला सगळं ठरवायचं असतं
व्यवस्थित, विचारपूर्वक करायचं असतं
खुपदा भेटून बोलायचं असतं
एकमेकांची मनं जुळवायचं असतं
आवडी-निवडी जपायचं असतं
विशावासाचं नातं विणायचं असतं
कारण एकदा प्रेमात पडल्यावर
पुन्हा मागे वळायचं नसतं
#mimarathiap

Tuesday, December 24, 2013

विश्वास

मोठमोठे लेखक, विचारवंत, कवी किंवा कोणतीही अनुभवी व्यक्ती जेंव्हा प्रेम या गोष्टीबद्दल आपले विचार मांडत असतात, तेंव्हा ते त्यांच्या बोलण्यात प्रकर्षाने एका गोष्टीवर जास्त भर देतात ते म्हणजे 'नात्यांतला विश्वास'.
एखाद स्वच्छ, सुंदर, नितळ नातं जपण्यासाठी पहिल्यांदा त्या दोन व्यक्तीं चा एकमेकांवर पुर्ण विश्वास असणं गरजेच आहे. कारण एखादी चुकीची कृती सुद्धा काहीवेळा आपल्या नात्याला मारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या व्यक्ती आणि तिच्यावरचा विश्वास मिळवण, विश्वास जपणं हे त्यावर प्रेम करण्या इतकचं महत्वाच आहे.
पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. खूप वेळा त्यांच्याशी खोट बोलतो, पाहिलं खोट लपविण्यासाठी अजून एखाद खोट बोलतो, मग त्या खोट्या गोष्टीची link इतकं मोठ स्वरूप धारण करते कि त्यानंतर आपण किती हि आदळ-आपट करून खर सांगायचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात ती सल कायम राहते.
कित्येक वेळा फक्त गैरसमजुतीतून सुद्धा असा तिढा निर्माण होतो, आणि ज्याची काहीच गरज नव्हती असे विषय सुद्धा त्यात आपल्या माथ्यावर येतात,
पळवाट काढणे हा तर विश्वास तोडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग अस मला वाटत, कारण आपण एखाद्या गोष्टीपासून पळ काढत आहोत हे समोरच्या व्यक्तीला कळायला आजच्या generation मध्ये तरी जास्त वेळ लागताच नाही, आणि एकदा का शंकेची पाल चुकचुकली कि मग ती सगळ गिळंकृत केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस आपल्या बद्दल कोणीही काहीही सांगितलेल्या गोष्टी नात्यां मद्धे फुट पाडू शकतात. तेंव्हा योग्य आणि अयोग्य अस काहीच नसत, पण क्षणाक्षणाला द्वेष मात्र वाढत जातो.
ह्या सगळ्या पेक्षा आधीच सगळं clear केलेलं काय वाईट. 
काय असेल ते सरळ सांगा, खर सांगा,
खर सांगायला घाबरायचं कशाला?? 
हा त्यावेळेस व्यक्तीला वाईट वाटेल, चिडचिड होईल,
मात्र ते फक्त त्या वेळेसाठीच असेल, आणि थोडं समजावलं कि झाल,
पण उगाच आपला इगो बाळगून जर त्या नात्यातला गोडवा टिकेल अस वाटत असेल तर ते चुकीच ठरू शकत.
थोडा संवाद, थोड प्रेम, थोडी कुरबुर आणि थोडी मस्ती हे साध सोप गणित असत सुखी राहण्याचं.
जितका एकमेकांवर विश्वास वाढेल तितक ते नात दृढ होत जाईल,

बस्स !!

बाकी काय ,

आपल सगळंच सेम हाय...