Wednesday, December 4, 2013
Thursday, November 7, 2013
'ती' कशी असावी
courtesy : Rohan Pore |
'ती' कशी असावी
खर म्हणजे वयात आलेल्या सगळ्याच मुलांचं स्वप्न असत, आपल्याला एखादी 'ती' असावी,
मग ती कोणीही असो पण असावीच,
कोणाला वाटत कि मस्त model type असावी, बरोबर ३६-२४-३६ च्याच साच्यातली असावी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी, आणि मोगऱ्याच्या बागेत गुलाबाच फुल असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
काहींच्या मते ती सालस असावी, देखणी नसली तरी चालेल पण मनमिळाऊ असावी,
आपल्याला सांभाळून घेणारी असावी, नाती जोपासणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
आपण भाई (!) असलो तर ती पण तशीच असावी, हातात सिगरेट आणि तोंडात शिट्टी असावी,
चार शिव्या घालणारी आणि वेळेला हातपाय चालवणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
ती आपली मैत्रीण असावी, माझी bag, mobile, वह्यापुस्तके सांभाळणारी असावी,
माझ्यासाठी घरातून मस्त डबा आणणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
MacD मध्ये treat देणारी असावी, महागडे perfumes, sunglasses देणारी असावी,
रोज movie ला नेणारी असावी, आणि corner seat वर चाळे करणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
मला वाटत कि ती फक्त तीच असावी, स्वाभिमान बाळगणारी असावी,
मला आपल म्हणणारी असावी आणि माझ्या स्वप्नात रमणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी.
#social_ak
Wednesday, November 6, 2013
चड्डीतलं वय
चड्डीतलं वय
ते चड्डीतल वय असतं,तेंव्हा फक्त ओरडणं, खेळाणं आणि बागडनं असतं,
राग आला कि मारणं असतं,
आणि कुणीतरी मारल्यावर बोंबलत घरी पळणं असतं,
ते वयचं तसलं असतं,
शाळेत न जाण्याची कारणं शोधणारं असतं,
कोणी जबरदस्ती केल्यावर त्यांच्याच हाताला चावणारं असतं,
खडू पेन्सिल खाणारं असतं,
आणि नवीन आणायला पैसे मागणारं असतं,
ते वयचं तसलं असतं,
कोणाच्या तरी हातातलं चांगलं खेळणं बघून रडणार असतं,
ते कस मोडता येईल हे बघणार असतं,
मोडल्यावर त्याला चिडवणार असतं,
पण त्याला जास्त रडताना बघून पुन्हा सांभाळणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
आपल्या गोष्टीवरती अधिकार गाजवणारं असतं,
त्याला हात लावला तर घर डोक्यावर घेणार असतं,
आणि शेवटी त्याची मालकी परत मिळवणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
पुन्हा कधीच येणारं नसतं..!!
#mimarathiap
कोणाच्या तरी हातातलं चांगलं खेळणं बघून रडणार असतं,
ते कस मोडता येईल हे बघणार असतं,
मोडल्यावर त्याला चिडवणार असतं,
पण त्याला जास्त रडताना बघून पुन्हा सांभाळणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
आपल्या गोष्टीवरती अधिकार गाजवणारं असतं,
त्याला हात लावला तर घर डोक्यावर घेणार असतं,
आणि शेवटी त्याची मालकी परत मिळवणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
पुन्हा कधीच येणारं नसतं..!!
#mimarathiap
Friday, October 25, 2013
'ती'
'ती'
सारखं माझ्यावर रागावते,बारीक बारीक चुका काढते,
प्रत्येक वेळी टोचून बोलते,
जोराने माझा कान ओढते,
तरीही मला ती खूप आवडते,
खुपदा उगाचच भांडते, बोलण टाळते,
"आम्ही नाही जा," म्हणत रुसून बसते,
आणि तास भराच्या आताच,
स्वतःच sry sry करते,
तरीही मला ती खूप आवडते,
"माझ्याकडे बघतच नाहीस,"
"बोलत का नाहीस माझ्याशी ??"
"तुला मी आजकाल आवडत नाही,"
अशी बडबड करून अक्षरशः डोक्यात जाते,
तरीही मला ती खूप आवडते,
"आपलं पुढे कस होणार रे ??,"
"घरचे तयार होतील ना रे आपल्या लग्नाला??",
"आपण पळून जावूया का??"
"मग आई-बाबांना काय वाटेल??",
सगळ स्वतःच बोलून टाकते,
तरीही मला ती खूप आवडते,
"हे तुला जमत नाही तरी का करतोस??"
"तू हा course का नाही करत"
"अरे इकडे इकडे असा असा job आहे"
फक्त माझाच विचार करते
म्हणूनच मला ती खूप आवडते,
"काय करतो आहेस??"
"जेवलास का नीट??"
"आज तुझ्या नावाने उपवास केलाय"
"तू ये नारे जवळ माझ्या"
अस बोलून जीवाचं पाणी पाणी करते,
म्हणूनच मला ती खूप आवडते.
#social_ak
Tuesday, October 22, 2013
Labels:
Facebook Timeline
Location:
Vasai, Maharashtra, India
Sunday, October 20, 2013
Labels:
Facebook Timeline
Location:
Nala Sopara, Maharashtra, India
Monday, October 7, 2013
Labels:
Facebook Timeline
Location:
Nala Sopara, Maharashtra, India
Subscribe to:
Posts (Atom)