Wednesday, December 24, 2014

चारोळी - ८

एक खून माफ असता तर
आधी तुलाच मारलं असतं,
तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं
विष तुलाच चारलं असतं.

Saturday, October 18, 2014

चारोळी - ७

कधीतरी दिसते ती
पैलतीरी नदीकाठी
खुळं काळीज फिरत मग
जुन्या आठवणी शोधण्यासाठी

Monday, July 21, 2014

रंग प्रेमाचा

सौरभ पाटील. माझा जवळचा मित्र.
पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं.
वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सुट्टी टाकून गावाला यायचं.
दोन वर्षापूर्वी त्याच एका मुलीशी लग्न झाल.
अर्थात पोरग एकमार्गी असल्याने घरच्यांनी ठरवून आणि मुलगी बघण्याचे सोपस्कर वैगेरे करून थाटामाटात लग्न एकुलत्या एक पोराच लग्न लावलं.
राजश्री. अगदी लाखात एक अशीच राजकन्या. अतिशयोक्ती असली तरी चारचौघीत उठून दिसणारी.
शिवाय चांगलीच शिकलेली.
लग्न झाल्यावर दोन तीन महिने नव्या पोरीच्या बागडण्याने कसे गेले हे कुणालाच कळले नाही.
आता सौरभ ची कामावर रुजू व्हायची वेळ आली.
परंतु ह्याच फिरस्तीच काम असल्यामुळे राजश्रीला तो गावीच ठेवून गेला.
पहिले काही महिने अर्थात राजश्रीला त्रासाचे गेले. बोलायला अस घरात फक्त सासू-सासरे.
त्यामुळे राजश्रीच माहेरी जाण वाढू लागलं. ती महिना महिना तिकडेच राहू लागली.
सौरभचे आईवडील आणि स्वतः सौरभ सुद्धा फार समंजस असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल.
परंतु राजश्री च्या मनात दुसराच खेळ होता.
तिचा कॉलेजचा एक मित्र तिला आवडायचा. आधी हिने कधी दाखवून दिल नव्हत, परंतु का कुणास ठावूक, लग्नानंतर हि त्याच्याकडे पुन्हा आकर्षली गेली.
आणि याचं प्रेम फुलू लागलं.
आता ती सौरभला टाळू लागली. त्याचा फोन, त्याचे Skype mails, कशालाच तीने उत्तर दिल नाही.
सौरभने तिच्यासाठी सगळ सहन केल. आई-वडिलांना या बाबत त्याने कधीच काही सांगितलं नाही.
त्यातच काही जागतिक आर्थिक हालचाली मुळे त्याने केलेला सुट्टीचा अर्ज फेटाळला गेला आणि त्याची रजा सहा महिने पुढे ढकलली गेली. हे दोन वेळा झालं.
आणि एक दिवशी अचानक राजश्रीचा त्याला फोन केला.
"'मला जेव्हा तुझ्या प्रेमाची गरज होती तेव्हा तू दोन वर्ष माझ्यापासून लांब राहिलास. तू तिथे मजा करत असशील, पण कधी माझा विचार केलास. माझ काय होत असेल इकडे. पण त्याच वेळी मला विशाल ने आधार दिला. त्याने मला माझ हरवलेलं प्रेम दिलंय. आणि आता आम्ही एकत्र राहण्याचा विचार केलाय. तुला एवढ्यासाठीच सांगतेय कि डिवोर्स चे पेपर्स तुला पाठवलेत, ते एवढे सही करून परत पाठव."
गेल्या महिन्यात ते पेपर्स परत आले, परंतु त्यासोबत सौरभचा मृतदेह सुद्धा होता.
मुद्दा हा, कि आजकाल आपण क्षणिक प्रेमासाठी इतके हपापालेलो आहोत कि आज हा किंवा हि तर उद्या त्याठिकाणी कुणी दुसराच किंवा दुसरीच असेल.
परंतु समाजात सौरभ सारखी सुद्धा मुल किंवा मुली आहेत हे मात्र विसरून जातो.
ज्याच्यासोबत साताजन्माच्या आणाभाका जर तुम्ही घेतल्या असतील तर दोन वर्ष त्रास सहन करायला काय जातंय.
प्रेमाला असाही एक रंग असतो हे मात्र नव्याने दिसून आलं.
चुकी दोघांचीही नाही म्हणा, चुकी आपल्या कम्यूनिटीची आहे.
जमाना बदललाय तरी लोक मात्र छत्तीस गुण जुळनारीच मुलगी किंवा मुलगा शोधतात, आणि म ती मुल अशाप्रकारे आपले छत्तीस गुण दाखवतात.
अरेंज कि लव्ह ह्या विषयात नाही घुसायचं नसलं तरी विचार येतातच.

- © Aakash Patil

Monday, June 30, 2014

एकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण??



आमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात.
तर असंच परवा आमच्या गावातला एक 'पंटर' सापडला आणि बोलता बोलता आमचा विषय 'हागणदारी मुक्त' वरून 'पाणी बचाव आंदोलना'पर्यंत कसा गेला ते पहा :



मी : काय म मज्जा हाय लगा तुमची. सरकार आता तुमच हगलेल बी काढालंय.

पंटर: कसलं काय घेवून बसलाइस. सरकार हगलेल काढतंय पर त्यासाठी सकाळी तासभर चड्डी धरून उभा रहायला लागतंय त्येच काय.

मी: तवढी कळ तर सोसायला पायजेलच की. तुम्हाला फुकट बी पायजे आणि लगेच बी. कस जमल. सोसा जरास आसुदे म्हणून.

पंटर: ते सोसालायोच र. पर कामाचा खुळांबा व्हायलाय कि त्यापायी. च्यामायला हगायला जायचं म्हणून सकाळी लवकर उठाया लागालंय नाहीतर पुढ धार काढायचं आणि वैरण आणायचं काम बोंबलतय.

मी: ते बी खर हाय म्हणा. बाकी पावसा-पाण्याच काय. पेरण्या काय म्हणत्यात.

पंटर: काय न्हायी लगा यंदा. पेरण्या झाल्या खर पाऊस न्हायी, पिकं गेली समदी. प्यायला बी पाणी नाही. धरणातालच पाणी आटायला लागलंय आता.

मी: सगळीकडच र. पाप केल्यासात तुम्ही, त्याच भोगा आता.

पंटर: त्येच मी म्हणतोय, हि गावोगावी कशाला संडास सरकार बांधालय? ह्यामुळच पाणी टंचाई आलीया.

मी: हाहा, काय बी बोलू नग. त्येच्याआयला तुम्हाला हवेशीर बसायचं असतंय म्हणून आता त्येला दोष दे.

पंटर: न्हायी र. खरच तर. बघ हा. गेली १०-१५ वर्ष चालू हाय सरकारची योजना. त्यामुळ आता पर्यंत महाराष्ट्रभर संडास बांधून झाली असतील. साधारण पण एका माणसाला दिवसाकाठी सरासरी १० लिटर पाणी लागतंय.

मी: डोचक नासलय. तिथ काय आंघोळीला जात्यात व्हय.

पंटर: तुला काय माहित त्यातलं. संडास बांधल्यापास्न समदी बामन झाल्यात. म्हणून संडासात शिरायच्या आदी पाणी व-वतुन पाक करून घेत्यात आणि मंगच आत जात्यात.

मी: हात्येच्या आयला.

पंटर: तर १० लिटर पाणी एका माणसाला म्हटल्यावर १००० माणसाला १०००० लिटर पाणी रोजच. आदीमधी जात्यात ते आणि येगळच. आता हिशेब तूच लाव भावा. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वाया जाणार पाणी. त्येच जर उघड्यावर परंतु गावापासून दूर कुठतरी चर मारून संडास बनवली असती तर एका तांब्यात म्हणजे एक लिटर पाण्यात सगळ आटोपलं असत. त्यात आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीत बी मुरलं असत. रोगराई पसरू नये म्हणून त्या मलमुत्रावर औषध फवारल असत म्हणजे कसलंच टेंशन न्हायी. निदान नाही म्हटलं तरी आत्ता जेवढ पाणी वय जातंय त्यातलं अर्ध तरी या नुसार आपल्याला नक्कीच वाचवता आल असत. पर तुमच्या आडणी भोकाच्या सरकारला कळणार कधी. नुसत पैशाची नासाडी दुसर काही न्हायी. नाव मोठ करायला आणली यांनी योजना आणि हगायला पायजे म्हणून प्यायलाच पाणी मिळणा अशी अवस्था झालीया.

मी: ….


पंटर न मारली एकच फाईट आणि माझीच झाली कि हो टाईट

Saturday, June 21, 2014

चारोळी - ६

तीळ तीळ तुटणार काळीज
संपून जाईल असंच

तुलाही परतावं लागेल मग
आली आहेस तसंच

Tuesday, June 10, 2014

चारोळी - ५

तिला आवडतो पाऊस.
म्हणून मला ही भिजायचंय..

तिने धरलेल्या पदराखाली.
डोळं मिटून निजायचंय...!

Sunday, June 1, 2014

चारोळी-4

भेटल्यावर तुला,
रात्र फार व्हायची.
कारणं शोधायचो तेव्हा,
घरी उशिरा जायची..!

Wednesday, May 28, 2014

चारोळी-3

'नया हैं यह' म्हणून
गंडवल तिने मला
पाकीट खाली झाल्यावर म्हणते
'कौन हैं ये साला'

चारोळी-2

सवय जडलीये आता,
रसाळ आंब्याच्या बाठांची.,
पण सर नाही त्याला,
तुझ्या आबोली ओठांची..!

चारोळी-1

अरे हम गरीब हुंए तो हुवा क्या,
करते हैं दिलसे प्यार.
तुला करायचं असेल तर कर वरना,
दुसरी तरी बघू दे ना यार !!